शेतात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह ; ओळख पटविण्याचे साखरखेर्डा पोलिसांचे आव्हान.
साखरखेर्डा — ग्राम लव्हाळा येथील शेतात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षांदरम्यान असून, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. शेतकरी साहेबराव सवळतकर यांच्या शेतात सदर मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. विशेष बाब म्हणजे या व्यक्तीवर कोणतेही कपडे नव्हते. स्थानिकांच्या सांगण्यानुसार, सदर इसम गेल्या काही…
