“आम्ही पोलीस आहोत, गाडी तपासायची आहे” असे म्हणत पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकाला पाच लाखाने लुटले
जानेफळ:- “आम्ही पोलीस आहोत, गाडी तपासायची आहे…” असे सांगत दोन भामट्यांनी सेवानिवृत्त शिक्षकाला भररस्त्यात अडवून तब्बल पाच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना जानेफळ येथे घडली. पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जानेफळ येथील सेवानिवृत्त शिक्षक मदन गोपीलाल लाहोटी हे सोमवारी (दि. १८) दुपारी…
