Headlines

बनावट गर्भवतीचा सापळा; तार कॉलनीत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, वर्षभरात बोगस डॉक्टर गवईविरुद्ध दुसऱ्यांदा कारवाई; पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह साहित्य जप्त

बुलडाणा : गर्भातील बाळाचे लिंग सांगण्यासाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्याचा आरोग्य विभागाने बनावट गर्भवती महिलेच्या माध्यमातून रचलेल्या सापळ्यात पर्दाफाश केला. बुलडाणा शहरालगतच्या सुंदरखेड येथील तार कॉलनी परिसरातील ‘बळीराम निवास’ येथे शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत अवैध गर्भलिंग निदानासह बेकायदेशीर गर्भपाताचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कैलास बळीराम गवई, विजय देवीचंद राठोड आणि साहील कैलास गवई…

Read More

दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

देऊळगाव मही : राजा-चिखली-देऊळगाव राजा चौपदरी महामार्गावरील रामनगर फाट्याजवळ मंगळवारी (२८ जुलै) दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील भरधाव वाहनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माहितीनुसार, अंत्री खेडेकर येथील रोहन कैलास माळेकर (वय २१)…

Read More

अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; सात बाटल्या जप्त, एकावर गुन्हा

बुलढाणा : जानेफळ येथील इंदिरानगर परिसरात अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत सात देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी गोपनीय माहितीच्या आधारे इंदिरानगर परिसरात छापा टाकण्यात आला. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीदरम्यान विलास कंकाळ…

Read More

कापड दुकानासमोरून दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध बुलढाणा पोलिसांत गुन्हा!

बुलढाणा : शहरातील एका कापड दुकानासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. २५) सायंकाळी घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास दिक्षन फुलझाडे (वय ४२, रा. दत्तपूर) यांनी आपली (एमएच-२८-बीसी-६७७९) क्रमांकाची दुचाकी शहरातील एका कापड दुकानाजवळ उभी करून दुकानात गेले…

Read More

मलकापुरात बालमजुरीविरोधी धडक कारवाई; तीन बालकामगारांची सुटका, दोघांवर गुन्हे दाखल

मलकापूर : “बालपण हे शिक्षणासाठी असते, मजुरीसाठी नाही,” या भूमिकेला बळ देणारी कारवाई मलकापुरात करण्यात आली. बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमांतर्गत कृतीदलाने शहरातील दोन आस्थापनांवर धाड टाकून तीन बालकामगारांची मुक्तता केली. या प्रकरणी संबंधित आस्थापन चालकांविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, बालमजुरीविरोधातील ही कारवाई शहरात चर्चेचा विषय ठरली…

Read More

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

शेगाव : शेगाव-खामगाव मार्गावरील माऊली वॉटर पार्कजवळ भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत ५३ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने शेगाव ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर तुळशीराम झाडे (वय ५३, रा. नवा अंदुरा, ता. बाळापूर) हे आपल्या दुचाकीने (एमएच-३०-एन-९७३०)…

Read More

विश्वकर्मा ज्वेलर्सवर मध्यरात्री डल्ला; लाखोचा ऐवज लंपास

लाखनवाडा : गावातील बसस्थानकाजवळ असलेल्या विश्वकर्मा ज्वेलर्स या सराफा दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. माहितीनुसार, २१ जून रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी मालक आले…

Read More

हॉटेलमध्ये पायाने मैदा तुडवल्याचा व्हिडिओ व्हायरल; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

जानेफळ : नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा धक्कादायक प्रकार जानेफळ येथे उघडकीस आला आहे. हॉटेलमध्ये समोसा, कचोरी व अन्य नाश्ता पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मैदा एका कामगाराकडून पायाने तुडवला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित हॉटेल व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे. जानेफळ येथील बसस्थानक…

Read More

अवैध रेती वाहतुकीवर एलसीबीची मोठी कारवाई; पाच टिप्परसह ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त! पाच जण ताब्यात

बुलढाणा : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पाच टिप्पर पकडले असून, तब्बल ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेहू परिसरात गुरुवारी मध्यरात्री ही धडक कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात…

Read More

मलकापूरच्या पाच जणांनी लंपास केला हरभऱ्याचा ट्रक; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २७० क्विंटल हरभऱ्यासह १८.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा:- मोताळा तालुक्यातील लालमाती येथील नाफेड केंद्रावरून वखार महामंडळाकडे पाठविण्यात आलेला २७० क्विंटल हरभरा भरलेला ट्रक परस्पर लंपास करून अपहार करणाऱ्या मलकापूर येथील पाच आरोपींना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत हरभऱ्यासह ट्रक असा एकूण १८ लाख ९१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत सीसीटीव्ही फुटेज…

Read More
error: Content is protected !!