११ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, जळगांव जामोद तालुक्यातील घटना!
जळगाव जामोद : तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील भटक्या-विमुक्त जाती-जमातींसाठीच्या सरस्वती निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे आश्रमशाळा परिसरात शोककळा पसरली आहे. मोहित अनिल वाकुडकर (वय ११, रा. धानोरा महासिद्ध) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. काही दिवसांपूर्वीच त्याने आश्रमशाळेत प्रवेश…
