शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; अडीच एकर मका जळून खाक, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
जळगाव जामोद : कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर जळताना पाहण्याची वेळ एका शेतकरी कुटुंबावर आली. ततारपूर शेतशिवारात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत कापणीसाठी तयार असलेला अडीच एकर मका जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना २८ मार्च रोजी दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास घडली. या आगीत पीकासह शेतीपयोगी साहित्यही भस्मसात झाल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले…
