मलकापूरात नालासफाई मोहीम संथ; अपुऱ्या कामांमुळे नागरिकांमध्ये नाराजी!
मलकापूर :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेकडून शहरातील नाल्यांच्या साफसफाईची मोहीम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असली, तरी अनेक भागांमध्ये ही मोहीम केवळ दिखाऊ ठरत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. अपुऱ्या साफसफाईमुळे नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा कायम असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका वाढला आहे. शहरातील विविध भागांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणारे सफाई कर्मचारी कामात दिरंगाई करत असल्याचा…
