२४ तासांत पोलिसांची चपळ कारवाई; फरार आरोपीसह ३.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
खामगाव : शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तत्परता दाखवत अवघ्या २४ तासांत फरार आरोपीला अटक करून चोरीतील सुमारे ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत प्रदीपराव देशमुख (वय ३२, रा. खामगाव) यांनी १ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या…
