आजरपणाला कंटाळवून शाहरुख खानची आत्महत्या

खामगाव : अपघातानंतरच्या गंभीर दुखापतीमुळे उद्भवलेल्या शारीरिक त्रास, आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावाला कंटाळून ३२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील शिरजगाव देशमुख येथील जनतानगर परिसरात रविवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे नाव फारूख ऊर्फ शाहरूख खान युसूफ खान (वय ३२) असे आहे. तो जनतानगर परिसरातील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर सुरू असलेल्या उपचारांमुळे आणि आर्थिक विवंचनेमुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास जनतानगर परिसरातील खदाणीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
याप्रकरणी मृतकाचा भाऊ आशिक खान युसूफ खान यांनी दिलेल्या माहितीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!