गोमांस विक्रीवर पोलिसांचा धडक छापा; तिघे जेरबंद, फाटकपुरा, दालफैल आणि मस्तान चौक परिसरातील कारवाईत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
खामगाव :- गोमांस विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी शहरातील फाटकपुरा, दालफैल आणि मस्तान चौक परिसरात धडक कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली. या कारवाईत कत्तल केलेले गोवंशाचे मांस, जिवंत गोवंश आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण १ लाख २४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरात…
