Headlines

दुचाकीवर बसण्यास नकार; वृद्धावर काठीने हल्ला, जीवे मारण्याची धमकी, डोणगाव पोलिसांत गुन्हा दाखल!

डोणगाव : – पायी घरी जात असलेल्या ६० वर्षीय वृद्धाला दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याच्या कारणावरून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना हिवरा साबळे फाटा येथे घडली. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मदन तुकाराम पोहरे (वय ६०, रा. जवळा, ता. मेहकर) हे २३ मे रोजी दुपारी सुमारे ३ वाजता हिवरा साबळे फाट्यावरून पायी घरी जात होते. त्यावेळी गावातील अमोल देवराव मोरे हा दुचाकीवर तेथे आला. त्याने पोहरे यांना दुचाकीवर बसण्यास सांगितले. मात्र, आरोपी शिवीगाळ करत असल्याने पोहरे यांनी त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला.
याचा राग आल्याने अमोल मोरे याने लाकडी काठीने पोहरे यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर जखमी वृद्धाने डोणगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय घिके करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!