सामाईक विहिरीच्या हिस्स्यावरून शेतात वाद; परस्परविरोधी तक्रारींवरून चौघांविरुद्ध गुन्हे
मेरा बु.:- शेतातील सामाईक विहिरीच्या हिस्स्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण होऊन शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना मेंडगाव शिवारात घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंदवून चौघांविरुद्ध कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेंडगाव येथील उषाबाई दत्तात्रय गीते आणि काशिनाथ…
