राशन आणण्यासाठी घराबाहेर पडणे पडले महागात; घरातून ५८ हजारांचा ऐवज चोरीला
खामगाव : राशन आणण्यासाठी काही वेळ घराबाहेर गेलेल्या महिलेचे घर चोरट्याने हेरले. दरवाजा उघडा असल्याची संधी साधून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी चिंचपूर येथे उघडकीस आली. चिंचपूर येथील वैशाली देशमुख (वय ५५) या राशन आणण्यासाठी घराबाहेर गेल्या…
