Headlines

नीलगाय आडवी आल्याने अपघात; जखमी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू

साखरखेर्डा : रस्त्यावर अचानक नीलगाय आडवी आल्याने झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या गुंज येथील ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी धोंडूजी तुपकर (वय ५९) यांचा उपचार सुरू असताना शुक्रवारी (२५ सप्टेंबर) मृत्यू झाला. या घटनेने गुंज गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गुंज ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले शिवाजी तुपकर हे १८ ऑगस्ट रोजी सकाळी दुचाकीने शेलगाव काकडे परिसराकडे निघाले होते. कोराडी धरण परिसरातील ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील नादुरुस्त मोटारपंप काढण्यासाठी ते जात होते. गुंज ते शेलगाव काकडे मार्गावरून जात असताना अचानक नीलगाय धावत येऊन दुचाकीसमोर आडवी आली. त्यामुळे दुचाकीस्वाराला वाहनावर नियंत्रण ठेवता न आल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, शिवाजी तुपकर यांच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे गुंज गावात हळहळ व्यक्त होत असून ग्रामपंचायत कर्मचारी व परिचितांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!