बुलडाण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आढळलेल्या अनोळखी मृतदेहांमुळे खळबळ; ओळख पटविण्यासाठी पोलिसांची धडपड
बुलढाणा :- शहर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राजूर घाटातील हनुमान मंदिराजवळील दरीत अंदाजे ३५ ते ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला, तर शहरालगतच्या जंगलात मानव जातीसदृश हाडांचा सांगाडा सापडला. दोन्ही घटनांची नोंद बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, मृतांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. राजूर घाटातील…
