गणराया पुरस्कारातून पारंपरिक विसर्जन मिरवणुकीला प्रोत्साहन; मलकापूर शहर पोलिसांचा अभिनव उपक्रम, पारंपरिक मंडळांना मिळणार पुरस्कार
मलकापूर : गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक संस्कृती, शिस्त आणि भक्तिमय वातावरणाला प्रोत्साहन मिळावे, तसेच मिरवणुकीला आधुनिकतेच्या नावाखाली येणाऱ्या अनावश्यक स्वरूपाला आळा बसावा, यासाठी मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने यंदा ‘गणराया पुरस्कार’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि संस्कृतीचे दर्शन…
