दोन टिप्परमध्ये तब्बल ८ ब्रास अवैध रेती; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त
अंढेरा : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अंढेरा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन टिप्पर पकडले. वाकी बुद्रुक फाट्यावर पेट्रोलिंगदरम्यान केलेल्या या कारवाईत दोन्ही टिप्परमध्ये प्रत्येकी ४ ब्रास याप्रमाणे एकूण ८ ब्रास अवैध रेती आढळून आली. दोन टिप्परसह रेती असा तब्बल ४० लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी…
