Headlines

२० किलोमीटर पाठलागानंतर गायचोरीचे वाहन पोलिसांच्या ताब्यातअंधाराचा फायदा घेत संशयित पसार

खामगाव : गाय चोरी करून कारमधून पळ काढणाऱ्या संशयितांचा पोलिसांनी तब्बल २० ते २५ किलोमीटर पाठलाग केला. अखेर बोरी अडगाव-वाडेगाव मार्गावर संशयित वाहन पोलिसांच्या हाती लागले; मात्र, कारमधील संशयितांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी कार जप्त केली असून, फरार संशयितांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरी अडगाव परिसरातून गाय चोरी करून संशयित…

Read More

मेहकरात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन दुकाने फोडून ऐवज लंपास ज्वेलर्समधून चांदीचे दागिने व डीव्हीआर, मेडिकलमधून रोकड चोरी

मेहकर : शहरातील मुख्य बाजारपेठेसह विठ्ठलनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून चोरी केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. श्रीकृष्ण ज्वेलर्सचे शटर फोडून चांदीचे दागिने व सीसीटीव्हीचा डीव्हीआर, तर मेडिकल स्टोअरमधून रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री घडलेल्या या घटनांमुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुन्या तहसील कार्यालयाजवळील श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मालक चंद्रशेखर…

Read More

शौचालयासाठी गेलेल्या दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार; चिखली तालुक्यात खळबळ

चिखली : दिव्यांगत्वाचा गैरफायदा घेत २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बोरगाव वसु येथे उघडकीस आली आहे. ५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी चिखली पोलिसांनी सवणा येथील ३५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव वसु येथील स्मशानभूमीच्या पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ पीडित तरुणी शौचासाठी गेली होती. यावेळी आरोपीने…

Read More

वाकोडी फाटा – बोदवड रोड पुलापर्यंत दोन्ही बाजूंनी नाली बांधकामासाठी भरीव निधीची मागणी

मलकापूर : वाकोडी फाटा ते बोदवड रोडवरील पुलापर्यंत दोन्ही बाजूंनी पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा आणि भविष्यात पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी नाली बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखाली वाकोडी ग्रामपंचायत सदस्य पराहुल राजपूत व सामाजिक कार्यकर्ते किरण फिरके यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची…

Read More

२४ तासांत अल्पवयीन मुलीचा शोध; खंडवा येथून सुखरूप आणले; नांदुरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

नांदुरा : शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नांदुरा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवित अवघ्या २४ तासांत मध्यप्रदेशातील खंडवा येथून मुलीचा सुखरूप शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या या कौशल्यपूर्ण तपासामुळे मुलीला सुरक्षितपणे तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात…

Read More

लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध; गर्भवती झाल्यानंतर लग्नास नकार; मलकापुरातील घटना

मलकापूर : लग्न करण्याचे आश्वासन देत महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे, तसेच नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी ३५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित महिला गर्भवती झाल्यानंतर तिने लग्नासाठी तगादा लावला असता आरोपीने लग्नास नकार देत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. मलकापूर येथील…

Read More

रेल्वे गाडीसमोर आत्महत्या; खामखेड परिसरात अनोळखी इसमाचा मृतदेह

मलकापूर : खामखेड रेल्वे परिसरात रेल्वे गाडीसमोर आत्महत्या केल्याने अंदाजे ३८ ते ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. ४ ऑगस्ट रोजी पहाटे ५.५२ वाजण्यापूर्वी खामखेड रेल्वे स्थानक परिसरातील कि.मी. ४८६/१३१५ येथे एका अनोळखी इसमाने रेल्वे गाडीसमोर आत्महत्या केल्याचे…

Read More

बकरीच्या पैशांवरून हत्या; पाडळी शिंदेत व्यक्तीचा खून; मृताच्या मुलीचा शेजारील व्यक्तीवर संशय

देऊळगाव राजा : तालुक्यातील पाडळी शिंदे येथे बकरीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा डोक्यात कठीण वस्तूने वार करून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या खळबळजनक घटनेत मृत महेंद्र तुकाराम मोरे यांच्या मुलीने अंडेरा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार देत शेजारील व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे….

Read More

दागिने चोरीप्रकरणी दोन संशयित महिलांना न्यायालयीन कोठडी

मलकापूर : एस.टी. बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या बॅगेतून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन संशयित महिलांची पोलीस कोठडी संपल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात बसमधील ८ ते ९ महिलांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. या सर्व महिला…

Read More

शेगाव येथे महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव

शेगाव: हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने लोकमान्य टिळक जयंती तसेच दैनिक लोक युवा वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६ वितरण सोहळ्याचे आयोजन शेगाव येथे करण्यात आले. विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून पुरस्कारासाठी ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या ६२८ प्रस्तावांमधून निवड करण्यात आलेल्या १२५ मान्यवरांना राज्यस्तरीय…

Read More
error: Content is protected !!