मलकापूरच्या ३० मतांवर सहकारातील सत्ता-समीकरणांचा फैसला; तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
मलकापूर ( दिपक इटणारे ): बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील मलकापूर मतदारसंघाचे चित्र आता स्पष्ट झाले असून, अवघ्या ३० मतदारांच्या निर्णयाभोवती संपूर्ण राजकीय गणित फिरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी प्रमुख इच्छुकांनी माघार घेतल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवचंद्र तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे प्रदेश सरचिटणीस संतोषराव रायपुरे आणि…
