Headlines

दागिने चोरीप्रकरणी दोन संशयित महिलांना न्यायालयीन कोठडी

मलकापूर : एस.टी. बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या बॅगेतून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन संशयित महिलांची पोलीस कोठडी संपल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात बसमधील ८ ते ९ महिलांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. या सर्व महिला एकाच परिवारातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबतची माहिती अशी की, ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथून शिर्डीकडे जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये खामगाव येथील प्रवासी अर्चना मधुकर उगले यांच्या बॅगमधून नांदुरा येथून बसलेल्या दोन महिलांनी सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यानंतर सदर एस.टी. बस मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी बसमधील ८ ते ९ संशयित महिलांना ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती घेतली. यावेळी दोन महिलांच्या थैल्यांमध्ये चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोकड रक्कम आढळून आली. त्यामुळे या दोन महिलांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. चोरीच्या मुद्देमालाबाबत संशयित महिलांकडून कबुली जबाब मिळाला नसल्याने पोलिसांनी तपासासाठी त्यांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत ५ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर दोन्ही संशयित महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातील इतर ८ ते ९ महिलांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. त्या सर्व महिला एकाच परिवारातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!