Headlines

ज्ञान वाटणाऱ्या शिक्षकाला सोशल मीडियावरही भरभरून प्रेम; मनीष मानकर सरांचे 100K फॉलोअर्स पूर्ण

मलकापूर : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे हे मोठे आव्हान मानले जाते. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न, समाजहिताची भूमिका आणि दर्जेदार माहितीच्या माध्यमातून शिक्षक मनीष मानकर यांनी Instagram वर १ लाख (100K) फॉलोअर्स पूर्ण करत एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. मनीष मानकर हे व्यवसायाने शिक्षक असून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते…

Read More

दारूच्या नशेत दुचाकी चालविणे पडले महागात; पोलिसांची कारवाई

मलकापूर : शहर पोलिसांनी राबविलेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत दारूच्या नशेत दुचाकी चालविणाऱ्या चालकावर कारवाई करण्यात आली. तहसील चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तहसील चौक परिसरात सागर अरुण खर्चे (वय ३२, रा. भालेगाव)…

Read More

दुकानातील गर्दीचा फायदा घेत पिशवी लंपास; ९० हजारांची रोकड, ८ चेकबुक गायब

जळगाव जामोद : शहरातील बालाजी मंदिर परिसरातील बालाजी ट्रेडिंग दुकानात चोरट्याने हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. दुकानाच्या काउंटरवर ठेवलेली हिरव्या रंगाची पिशवी अज्ञात व्यक्तीने लंपास केली. या पिशवीत ९० हजार रुपयांची रोकड आणि चार बँकांची आठ चेकबुक होती. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धान्य व्यापारी हरीदास माणिकराम माटे (वय…

Read More

तांदुळवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा; १० बाटल्या जप्त

मलकापूर : तांदुळवाडी येथे बेकायदेशीरपणे देशी दारू बाळगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एमआयडीसी दसरखेड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ४०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १० बाटल्या जप्त करून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तांदुळवाडी येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गौतम मधुकर तायडे (वय ३१, रा. तांदुळवाडी, ता….

Read More

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव जामोद : माहेरहून पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहित महिलेचा पतीसह नातेवाईकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची तक्रार जळगाव जामोद पोलिसांत दाखल झाली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल मोहल्ला, बहादूरपुरा, जिल्हा बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे ही घटना घडली. तक्रारदार महिलेने पती तसेच त्याच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी करून…

Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती प्रति शेगाव घिर्णी येथे उत्साहात साजरी

घिर्णी – मलकापूर : 1 ऑगस्ट 2026 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उपेक्षितांचे कैवारी असणाऱ्या अण्णाभाऊंना यानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. मलकापूर तालुक्यातील प्रति शेगाव घिर्णी येथे *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, घिर्णी* आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाचे मुख्य…

Read More

बनावट गर्भवतीचा सापळा; तार कॉलनीत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, वर्षभरात बोगस डॉक्टर गवईविरुद्ध दुसऱ्यांदा कारवाई; पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह साहित्य जप्त

बुलडाणा : गर्भातील बाळाचे लिंग सांगण्यासाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्याचा आरोग्य विभागाने बनावट गर्भवती महिलेच्या माध्यमातून रचलेल्या सापळ्यात पर्दाफाश केला. बुलडाणा शहरालगतच्या सुंदरखेड येथील तार कॉलनी परिसरातील ‘बळीराम निवास’ येथे शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत अवैध गर्भलिंग निदानासह बेकायदेशीर गर्भपाताचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कैलास बळीराम गवई, विजय देवीचंद राठोड आणि साहील कैलास गवई…

Read More

वारी हनुमान येथे नदीच्या डोहात 22 वर्षीय युवक बुडून बेपत्ता

खामगाव : दर्शनासाठी वारी हनुमान येथे गेलेल्या खामगाव तालुक्यातील खुटपुरी येथील २२ वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारी घडली. अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या तिघांपैकी दोघांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले; मात्र एक युवक पाण्याच्या खोल डोहात बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खुटपुरी येथील योगेश प्रकाश वानखेडे (वय २२) हा दोन…

Read More

समृद्धी महामार्गावर शिक्षकाची विष प्राशन करून आत्महत्या; परिसरात हळहळ

दुसरबीड : सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने समृद्धी महामार्गावर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३१ जुलै रोजी सकाळी घडली. जगन्नाथ मधुकर शिंदे (४०) यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जगन्नाथ शिंदे हे झोटिंगा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून…

Read More

नदीत पाय घसरून पडल्याने ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

जळगाव जामोद : शहरातील गैरान (महासिद्ध महाराज नदी) परिसरात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. नदीकाठी शौचासाठी गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. सिद्धार्थ नगर येथील रहिवासी महादेव जागजव वागोदे (वय ५५) हे नदीकाठी गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या…

Read More
error: Content is protected !!