भर चौकातील मोबाईल शॉपी फोडून १२ हजारांचा ऐवज लंपास! माटरगाव येथील घटना

जलंब : माटरगाव येथील भर चौकात असलेल्या मोबाईल शॉपीचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व मोबाईलसह सुमारे १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २० एप्रिलच्या मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील माटरगाव येथील रहिवासी मंगेश बोराखडे यांची ग्रामपंचायतीलगत भर चौकात ‘जय माता दी मोबाईल शॉपी’ आहे. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील रोख ४ हजार ५०० रुपये तसेच जिओ कंपनीचे तीन मोबाईल (३ हजार ५०० रुपये किंमत) व हेडफोनसह इतर साहित्य (सुमारे ४ हजार रुपये) असा एकूण १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सदर प्रकरणी मंगेश बोराखडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!