म्हाडा कॉलनीत दोन गटांमध्ये तुफान राडा; परस्परविरोधी गुन्हे दाखल
शेगाव : शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप करत तक्रारी दाखल केल्याने शेगाव शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन प्रल्हाद तायडे (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रुख्माबाई तायडे, दशरथ करणकार, सहादेव करणकार, मुकेश सावळे…
