किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा
शेगाव : शहरातील जयअंबे नगर परिसरात किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद हिंसक वळण घेत एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ नारायण म्हस्के (वय ३१) हे २३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास शेतातून घरी परतत…
