Headlines

घरासमोर उभा केलेला ऑटो मध्यरात्री लंपास; शेगावात चोरीचा गुन्हा

शेगाव : घरासमोर उभा केलेला ऑटो मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शहरातील मुरारका शाळेसमोरील भुतबंगला परिसरात घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुरारका शाळेसमोर, भुतबंगला परिसरात राहणारे श्रीकृष्ण भिमराव लासुरकर (वय ४४) हे ऑटोचालक आहेत. त्यांनी त्यांचा एमएच-२८-टी-३८८१ क्रमांकाचा पियाजिओ एपी डिझेल थ्री-व्हीलर ऑटो २८ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजता घरासमोर उभा केला होता. मात्र, त्यानंतर अज्ञात चोरट्याने ऑटो लंपास केला. ऑटो चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर लासुरकर यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीस गेलेल्या ऑटोची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी २९ जुलै रोजी दुपारी १२.२३ वाजता गुन्हा क्रमांक ४८०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेगाव शहर पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!