Headlines

शीर्वाद गेस्ट हाऊसमध्ये देहव्यापारावर पोलिसांचा छापा; ६ जणांविरुद्ध गुन्हा, शेगांवची घटना!

शेगाव : शहरातील इकबाल चौक परिसरातील आशीर्वाद गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या कथित अनैतिक देहव्यापाराच्या अड्ड्यावर शेगाव शहर पोलिसांनी सापळा रचून धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करून देणे, ग्राहकांची व्यवस्था करणे व आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेल्या ६ जणांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील इकबाल चौक परिसरात…

Read More

दारूच्या नशेत पत्नीला बेदम मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव : दारूच्या नशेत पत्नीला अमानुष मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शेगाव शहरातील पंचशील नगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी जखमी महिलेच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. शालीनी सुनिल गवारगुरु (वय ४०, रा. पंचशील नगर,…

Read More

दारूच्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून; शेगाव हादरले

शेगाव : दारू पिण्यासाठी पैशांच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना शेगाव शहरातील आठवडी बाजार परिसरात घडली. लाकडी दांड्याने डोक्यावर मारहाण केल्याने ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

अंघोळीचे अश्लील फोटो काढले; “माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा फोटो व्हायरल करीन; अतिथी रेस्टॉरंट चालकाविरुद्ध अॅट्रॉसिटीसह गुन्हा

शेगाव : शहरातील खामगाव रोडवरील अतिथी रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचे अंघोळ करतानाचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकल्याचा आरोप असून, विरोध केल्यानंतर मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी…

Read More

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पती व सासूविरुद्ध गुन्हा; ५ लाखांच्या मागणीसाठी मारहाण, धमक्या; विवाहितेला घराबाहेर काढल्याचा आरोप

शेगाव : कमी हुंडा व सोनं दिल्याचा आरोप करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती आणि सासूविरुद्ध शेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेरहून ५ लाख रुपये आणण्याची मागणी करत मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या देणे तसेच घराबाहेर काढल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. पल्लवी राहुल दाणे…

Read More

एसबीआय बँकेसमोर दिवसाढवळ्या हातसफाई; स्कुटीची डिक्की फोडून ३५ हजारांवर डल्ला

शेगाव : शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धाडसी हातसफाई करत एसबीआय बँकेसमोर उभी असलेल्या स्कुटीची डिक्की फोडून ३५ हजार रुपये लंपास केले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे बँक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फरशी जामा मशिदीजवळ राहणारे मोहम्मद शरीफ मोहम्मद याकूब (वय ४७) हे प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या पार्टनर मोहम्मद इरफान मोहम्मद…

Read More

रोकडिया नगरात घरफोड्यांची मालिका; दोन घरांतून सोन्याचे दागिने व रोकड लंपास

शेगाव : शहरातील रोकडिया नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन बंद घरांना लक्ष्य करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजानन गणेश कराळे (वय ३३, रा. नागझरी,…

Read More

खोटी माहिती देत विवाह; विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध शेगांव पोलिसांत गुन्हा दाखल!

शेगाव : – खोटी माहिती देऊन विवाह करून फसवणूक केल्याचा आरोप करत विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देणे, मारहाण करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध शेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ५ मे २०२६ रोजी हा गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादी कांचन रघुनाथ सिंग ठाकूर (वय ४९, रा. गीतेचा…

Read More

शेगावमध्ये भरदिवसा दुचाकी लंपास; पोलिसांत गुन्हा दाखल

शेगाव : शहरातील बाळापूर रोड परिसरातून भरदिवसा दुचाकी चोरीची घटना घडल्याने वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मुरारका शाळेजवळ उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने काही मिनिटांत लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण रामकृष्ण गवळी (वय ४६, रा. मोदी नगर, बाळापूर रोड,…

Read More

जागेच्या वादातून कुटुंबावर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

शेगाव : शहरातील धनगर फैल भागात जागेच्या वादातून एकाच कुटुंबावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश गोरखनाथ देवकते (वय ३९, व्यवसाय चालक, रा. धनगर फैल, वार्ड क्र. ०४, शेगाव, सध्या मुक्काम अंबरनाथ ता….

Read More
error: Content is protected !!