Headlines

शेगावात बालकामगारांविरोधात धडक कारवाई; एका बालकामगारासह दोन किशोरवयीनांची मुक्तता, दोन आस्थापनांवर गुन्हे

शेगाव :-बालकामगार प्रथा रोखण्यासाठी कामगार विभागाच्या कृतीदलाने शेगाव येथे धाड टाकून एका बालकामगारासह दोन किशोरवयीन कामगारांची मुक्तता केली. या प्रकरणी संबंधित दोन आस्थापनाधारकांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ (सुधारणा २०१६) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या नियंत्रणाखाली कामगार विभागाच्या कृतीदलाने २८ जुलै रोजी शेगाव…

Read More

मनार्डी फाट्याजवळ दुचाकी अपघात; वडगाव वान येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

वडगाव वान : वरवट बकाल–शेगाव मार्गावरील मनार्डी फाट्याजवळ झालेल्या दुचाकी अपघातात वडगाव वान येथील एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृत युवकाचे नाव संतोष ओमप्रकाश सोनी असे आहे. शनिवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मनार्डी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या संतोष सोनी यांना तातडीने वरवट बकाल…

Read More

वृद्ध वडिलांना मुलाकडून मारहाण; शेगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा

शेगाव : किरकोळ कारणावरून ७० वर्षीय वृद्ध वडिलांना शिवीगाळ करून हात पिरगाळत मारहाण केल्याची घटना शेगाव तालुक्यातील गोळेगाव बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोंद्राजी बाबन समदुर (७०, रा. गोळेगाव बुद्रुक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुनील बोंद्राजी समदुर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

Read More

फोनवरून चौकात बोलावून युवकाला चापट – बुक्क्यांनी मारहाण; दोन भावांविरुद्ध गुन्हा

शेगाव : फोन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोलावून एका युवकाला लोखंडी कड्याने मारहाण करत जखमी केल्याची घटना १९ जुलै रोजी शेगाव शहरात घडली. या प्रकरणी दोन सख्ख्या भावांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन विलास मदने (वय ३७, रा. जनकनगर, वरवट रोड, शेगाव) यांच्या…

Read More

बांधकामावर काम करताना उंचावरून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

शेगाव : शहरातील जमजम नगर परिसरात निर्माणाधीन इमारतीवर बांधकामाचे काम करत असताना उंचावरून पडल्याने २७ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १८ जुलै रोजी सायंकाळी घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत युवकाचे नाव शेख समीर शेख चांद (२७, रा. मशिदीजवळ, मेहबूब नगर, खामगाव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख समीर…

Read More

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

शेगाव : शेगाव-खामगाव मार्गावरील माऊली वॉटर पार्कजवळ भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत ५३ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने शेगाव ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर तुळशीराम झाडे (वय ५३, रा. नवा अंदुरा, ता. बाळापूर) हे आपल्या दुचाकीने (एमएच-३०-एन-९७३०)…

Read More

सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणातील आरोपी शेगाव रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

शेगाव : नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणाचा छडा लावत शेगाव लोहमार्ग पोलिसांनी संशयित आरोपीला मलकापूर येथे ताब्यात घेत चोरीतील दागिने व रोख रक्कम जप्त केली. रेल्वे पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे आरोपीला अटक करण्यात यश आले असून प्रवाशांच्या सुरक्षेबाबतचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. नांदेड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८७/२०२६ अंतर्गत भारतीय…

Read More

पेठ मोहल्ल्यात मुलांच्या वादातून दोन गट आमनेसामने; परस्परविरोधी गुन्हे दाखल

शेगाव : शहरातील पेठ मोहल्ला परिसरात मुलांच्या किरकोळ भांडणाचे रूपांतर दोन गटांतील हाणामारीत झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत दोन्ही बाजूंच्या व्यक्ती जखमी झाल्या असून शेगाव शहर पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटांतील एकूण १८ जणांसह काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या…

Read More

म्हाडा कॉलनीत दोन गटांमध्ये तुफान राडा; परस्परविरोधी गुन्हे दाखल

शेगाव : शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप करत तक्रारी दाखल केल्याने शेगाव शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन प्रल्हाद तायडे (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रुख्माबाई तायडे, दशरथ करणकार, सहादेव करणकार, मुकेश सावळे…

Read More

जागेच्या बांधकामाच्या वादातून तिघांकडून हॉकी स्टिकने हल्ला; तिघे जखमी

शेगाव : जागेच्या बांधकामावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन तिघांना हॉकी स्टिक व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना शहरातील शिवनेरी चौक परिसरात घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी समीना बानो मुस्ताक खान (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती मुस्ताक खान यांनी आरोपी हमीद खान यास त्यांच्या…

Read More
error: Content is protected !!