रस्त्याच्या किरकोळ वादातून ४२ वर्षीय शेतकरी-व्यावसायिकाची निर्घृण हत्या, चिंचपूर येथे लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; मुख्य आरोपी अटकेत, इतर संशयितांचा शोध सुरू
मोताळा : रस्त्याने ये-जा करण्याच्या क्षुल्लक कारणातून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना मोताळा तालुक्यातील चिंचपूर येथे घडली. गुरुवारी (२५ जून) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ४२ वर्षीय शेख नईम शेख सलीम यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मुख्य आरोपी निलेश सिताराम मापारी…
