वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी फूस लावून पळवली; कुऱ्हा काकोडाच्या आकाश चौफेवर गुन्हा दाखल!

  मोताळा : – बोराखेडी शिवारातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील १५ वर्षीय मुलगी फूस लावून पळविण्यात आल्याची घटना ४ एप्रिल रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी कुर्हा काकोडा येथील आकाश चौफे याच्याविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील एक महिला आपल्या कुटुंबासह बोराखेडी शिवारातील वीटभट्टीवर मजुरीचे काम…

Read More

विषारी औषध प्राशन करून २० वर्षीय तरुणाची आत्महत्या, मोताळा तालुक्यातील खरबडी येथील घटना!

  मोताळा :- तालुक्यातील खरबडी येथील २० वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना १ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृत युवकाचे नाव ओम दिलीप किनगे असे असून, विष घेतल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाइकांनी त्याला तातडीने बुलढाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले….

Read More

शेलापूर येथील युवकाची आत्महत्या विष प्राशन करून आयुष्य संपवले; कारण अद्याप गुलदस्त्यात

मोताळा : तालुक्यातील शेलापूर येथील एका ३५ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ९ मार्च रोजी घडली. सनी बारसू मोरे (वय ३५) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना शेलापूर शिवारातील भाडगनी या ठिकाणी उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला असून, याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात…

Read More

गौण खनीज प्रकरणात मोताळ्याचे लाचखोर नायब तहसीलदार रावळकर एसीबीच्या ताब्यात; मुरूम गाडीला परवानगी देण्यासाठी १४ हजारांची लाच मागितल्याचा आरोप

मोताळा (प्रतिनिधी) – गौण खनिज परवाना देण्याच्या मोबदल्यात १४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मोताळा येथील नायब तहसीलदार कौतिकराव रावळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने आज दुपारी ताब्यात घेतले. ही कारवाई मोताळा तहसील कार्यालयात थेट करण्यात आली असून, यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार नांदुरा तालुक्यातील असून त्याचा माती भरलेला ट्रक रावळकर यांनी…

Read More

धावत्या टाटा मॅजिकला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही; रोहिणखेड येथील घटना

रोहणखेड – सुलतानपूर येथून रोहिणखेडकडे साड्या खरेदीसाठी निघालेल्या टाटा मॅजिक वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. रोहिणखेडनजीक पाण्याच्या टाकीजवळ ही घटना शनिवार, 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता घडली. वाहनचालक शेख इकबाल शेख हसन हे त्यांच्या मालकीच्या टाटा मॅजिक (MH-17-BX-3283) या वाहनासह जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून त्वरित गाडी थांबवली व…

Read More

विद्युत धक्क्याने सहाय्यकाचा मृत्यू, गुन्हा दाखल; मोताळा तालुक्यातील घटना!

  मोताळा:- तालुक्यातील बोरखेडी येथे विद्युत दुरुस्ती करताना शेतात विजेचा धक्का बसून एका विद्युत सहाय्यकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. मृत व्यक्तीचे नाव हनुमान चव्हाण (वय ४९) असे असून, ते विद्युत महावितरण कंपनीत सहाय्यक…

Read More

हात पकडून महिलेची छेडछाड; विरोध करणाऱ्या जेठाला फायटरने मारहाण, मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळा : – तालुक्यातील एका गावात ३८ वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना घडली. महिलेला एकटी पाहून ३२ वर्षीय प्रविण घोरपडे याने तिचा हात पकडत छेडछाड केली. महिलेच्या जेठाने हा प्रकार पाहून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने फायटरने हल्ला करून जेठाच्या नाक, ओठ आणि गालाला जखमी केले. शिवाय, घटनेबाबत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली….

Read More

पोफळी येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याची उत्साहात तयारी..

  मोताळा: भक्तीमय वातावरणात पोफळी येथे दरवर्षीप्रमाणे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गावकरी आणि भाविक भक्तांच्या सहकार्याने हा सोहळा भक्तिरसात पार पडणार आहे. यंदा दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्रींची आरती होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने न्हाऊन…

Read More

समृद्धी महामार्गावर थार कारचा भीषण अपघात; एक ठार, तिघे जखमी

डोणगाव :- प्रयागराजहून मुंबईकडे परतणाऱ्या महिंद्रा थार कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी कार ट्रकवर धडकल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. अपघातात आणखी दोघांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी १० वाजता डोणगाव शिवारातील मुंबई कॉरिडोर चॅनेल क्रमांक २८८.८ जवळ घडली. प्रयागराज येथून महिंद्रा…

Read More

मोताळा तालुक्यातील कोथळी येथील २७ वर्षीय महिला बेपत्ता!

मोताळा :- तालुक्यातील कोथळी येथील एका २७ वर्षीय महिला ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, सादिक खान रोशन खान यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य रात्री जेवण करून झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री १२.३० वाजता त्यांच्या पत्नी पाणी पिण्यासाठी उठल्या असता, मुलगी आसमा फिरदोस…

Read More
error: Content is protected !!