Headlines

दोन लाखांच्या बदल्यात आठ लाखांचे बनावट चलन! खामगाव-शेगावातील तिघांसह चौघे पोलिसांच्या जाळ्यात; १२.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव : कमी पैशांत मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा संगमनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अवघ्या दोन लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल आठ लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा प्रकार या कारवाईत उघड झाला. या प्रकरणात खामगाव व शेगाव येथील तिघांसह नाशिक येथील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संगमनेर शहर व परिसरात…

Read More

वारी हनुमान येथे नदीच्या डोहात 22 वर्षीय युवक बुडून बेपत्ता

खामगाव : दर्शनासाठी वारी हनुमान येथे गेलेल्या खामगाव तालुक्यातील खुटपुरी येथील २२ वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारी घडली. अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या तिघांपैकी दोघांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले; मात्र एक युवक पाण्याच्या खोल डोहात बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खुटपुरी येथील योगेश प्रकाश वानखेडे (वय २२) हा दोन…

Read More

शेलोडीत विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा

खामगाव : तालुक्यातील शेलोडी येथे २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २८ जुलै रोजी घडली. सासरकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी दिल्यानंतर खामगाव ग्रामीण पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि दीर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचे नाव वैष्णवी अनंता वडोदे…

Read More

उधारीचे पैसे मागितल्याचा राग; तरुणावर काठीने हल्ला

खामगाव : उधारीचे पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून दोन जणांनी एका २६ वर्षीय तरुणाला शिवीगाळ, धक्काबुक्की करत लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना खामगाव तालुक्यातील अटाळी येथे घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अटाळी येथील बजरंग नजरुसिंग काळे (वय २६) हे २२ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास…

Read More

पेट्रोल टाकून जाळून हत्या; चोपडे मृत्यूप्रकरणी आणखी दोघे जेरबंद

खामगाव : सुटाळपुरा येथील किशोर काशीराम चोपडे (४९) यांना पेट्रोल टाकून जाळल्याच्या प्रकरणात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर शहर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी दोघांना अटक केली आहे. या कारवाईनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या चार झाली आहे. शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये दीपाली किशोर चोपडे आणि पांडुरंग नारायण बोचरे यांचा समावेश आहे. यापूर्वी अजय पांडुरंग…

Read More

शेतरस्त्याच्या जुन्या वादातून घरासमोर येऊन तिघांना मारहाण, जीवे मारण्याची धमकी

खामगाव : वडिलोपार्जित शेतीच्या रस्त्याच्या जुन्या वादातून लोणी गुरव येथे घरासमोर येऊन एका व्यक्तीने कुटुंबातील तिघांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १८ जुलै रोजी रात्री घडली. या प्रकरणी फिर्यादीच्या पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी रात्री आरोपी दारूच्या नशेत फिर्यादीच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागला. फिर्यादीचे पती…

Read More

घरगुती कलहाचा दुर्दैवी शेवट; पारखेड येथे पिता-पुत्राची आत्महत्या

खामगाव :-“घरातील वाद कधी कधी इतका टोकाला जातो की, त्याची किंमत संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागते.” खामगाव तालुक्यातील पारखेड येथे अशीच हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. घरगुती कारणातून वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खामगाव ग्रामीण पोलिस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष…

Read More

हुंड्याच्या मागणीने साखरपुडा मोडला; सहाजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

खामगाव : विवाहासाठी हुंड्याची मागणी करून साखरपुडा मोडत मुलीच्या कुटुंबाची फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळापूर फैल परिसरातील ४२ वर्षीय फिर्यादी यांच्या तक्रारीवरून कपिल सिद्धार्थ धांडे, सिद्धार्थ मनाजी धांडे, जिजाबाई सिद्धार्थ धांडे, कमला रमेश इंगळे (सर्व रा. बाळापूर, जि. अकोला), सुलक्षणा ऊर्फ सोनल…

Read More

वीजेच्या तडाख्यात शेतकऱ्याची बैलजोडी दगावली; ७० हजारांचे नुकसान, खामगांव तालुक्यातील घटना!

खामगाव:- मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असताना खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथे दुर्दैवी घटना घडली. शेतकरी संजय लक्ष्मण गव्हाणे यांच्या गोठ्यावर वीज कोसळल्याने त्यांची बैलजोडी जागीच दगावली असून या घटनेत सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २२ व २३ जून रोजी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह…

Read More

पळशीत घर-दुकान फोडून चोरी; ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास

खामगाव : तालुक्यातील पळशी बु. येथे अज्ञात चोरट्यांनी घर व दुकानाचे कुलूप तोडून रोकडसह ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली सदानंद धनोकार (वय ४१, रा. पळशी बु., ता. खामगाव) या कटलरी व कापड व्यवसाय…

Read More