Headlines

घरगुती कलहाचा दुर्दैवी शेवट; पारखेड येथे पिता-पुत्राची आत्महत्या

खामगाव :-“घरातील वाद कधी कधी इतका टोकाला जातो की, त्याची किंमत संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागते.” खामगाव तालुक्यातील पारखेड येथे अशीच हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. घरगुती कारणातून वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खामगाव ग्रामीण पोलिस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हरिश्चंद्र गावंडे (५०) आणि त्यांचा मुलगा विठ्ठल संतोष गावंडे (३०) अशी मृतांची नावे आहेत. रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. दुहेरी आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी प्राथमिक माहितीनुसार घरगुती कारणातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे पारखेड गावात शोककळा पसरली असून, नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. खामगाव ग्रामीण पोलिस आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!