जबरी चोरी प्रकरण उघड; तिघांना अटक, ५.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त!
देऊळगाव राजा :- तालुक्यातील बायगाव बु. येथे झालेल्या जबरी चोरीप्रकरणी पोलिसांनी वेगवान कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या चोरीत सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती व…
