मेहकर :- समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ रविवारी पहाटे खाजगी ट्रॅव्हल्सने समोरील अज्ञात ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २७ प्रवासी जखमी झाले. अपघातात १५ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी झाले असून सर्वांना तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून नागपूरकडे जाणारी एमएच ३१ एफसी ७४६८ क्रमांकाची ट्रॅव्हल्स ८ जून रोजी पहाटे सुमारे ४.२१ वाजता मेहकर हद्दीतील समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्त झाली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सने समोरील ट्रकला धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला. या अपघातात प्रणाली उमेश खोरगडे, अभय श्याम पवनिकार, आमरा झैब हुसेन, सुमन रॉय, शुभांगी सचिन बेनवाल, रितेश प्रल्हाद किंकरे, प्रथा सुनील शर्मा, वंदना चंद्रशेखर शेंद्रे, प्रदीप जी. तागे, यश बैनलवार, पुरुषोत्तम शिवाजी भिमान, मधू अनिल तैलानी, अरुणा दिनेश महोरे, अनिल तैलानी, अमोल मधुकर साळुंके, शुभम सावळाराम सिरसाट, नाझ झैब हुसेन, अस्का झैब हुसेन, सक्षम खोरगडे, युविका खोरगडे, चांदणी खोरगडे, मोरे, सूरज लक्ष्मण, विलास भगवान काके, प्रांजली प्रमोद लुटे, संभाजी राजाराम वाळूज, प्रकाश भास्कर कपागार व चंद्रशेखर रामकृष्ण शिंदे हे प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे.