धार्मिक स्थळही असुरक्षित; देवीच्या मूर्तीवरील चांदीचे डोळे चोरी, दानपेटीही फोडली! डोणगाव तालुक्यातील घटना
डोणगाव :- तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे शेतात स्थापित केलेल्या येडेश्वरी देवीच्या मूर्तीवरील चांदीचे डोळे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागोराव रामकिसन आखरे यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या शेतात देवीची मूर्ती स्थापन केली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मूर्तीला सुमारे साडेसात तोळ्यांचे चांदीचे डोळे बसवले होते….
