Headlines

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डॉक्टर दाम्पत्य ठार, तिघे गंभीर

सिंदखेडराजा : समृद्धी महामार्गावरील आणखी एका भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची दोन मुले व चालक गंभीर जखमी झाले. मंगळवारी सकाळी किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फॉर्च्यूनर कारने चालत्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा हृदयद्रावक अपघात घडला. या अपघातात डॉ. सय्यद असिफ सय्यद उमर (५२) व त्यांच्या पत्नी…

Read More

पळशीत घर-दुकान फोडून चोरी; ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास

खामगाव : तालुक्यातील पळशी बु. येथे अज्ञात चोरट्यांनी घर व दुकानाचे कुलूप तोडून रोकडसह ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली सदानंद धनोकार (वय ४१, रा. पळशी बु., ता. खामगाव) या कटलरी व कापड व्यवसाय…

Read More

मलकापूरात नकली नोटांचा सुळसुळाट; व्यापाऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन; ५० ते १०० रुपयांची खरेदी करून ५०० रुपयांच्या बनावट नोटा खपविण्याचा प्रकार उघड

मलकापूर : शहरात नकली नोटांची मालिका सुरू असतानाच आता व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. काही अनोळखी महिला ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन विविध व्यावसायिकांकडे जात असून किरकोळ खरेदी करून चलनातील खऱ्या नोटा घेऊन पसार होत असल्याची माहिती पुढे आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ५० ते १०० रुपयांपर्यंतची किरकोळ खरेदी करून…

Read More

विजय साठे यांच्या ठिय्या आंदोलनाची दखल; घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात, पुराव्यानिशी आक्रमक पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रकरणांबाबत प्रशासनाची हालचाल

मलकापूर : म्हैसवाडी येथील प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेतील कथित अनियमिततेविरोधात शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी केलेल्या दोन तासांच्या ठिय्या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, रखडलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून, विजय साठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची चर्चा होत आहे. म्हैसवाडी येथील अनेक…

Read More

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

शेगाव : शेगाव-खामगाव मार्गावरील माऊली वॉटर पार्कजवळ भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत ५३ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने शेगाव ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर तुळशीराम झाडे (वय ५३, रा. नवा अंदुरा, ता. बाळापूर) हे आपल्या दुचाकीने (एमएच-३०-एन-९७३०)…

Read More

मध्यरात्री घरात घुसून युवतीचा विनयभंग; वृद्धाविरुद्ध गुन्हा, मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : उमाळी गावात एका १९ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री घराच्या आवारात घुसून युवतीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ६५ वर्षीय वृद्धाविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमाळी येथील १९ वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गजानन सहादू रोठे (वय ६५, रा. उमाळी, ता. मलकापूर)…

Read More

चांदमारी परिसरात ६१ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

खामगाव : शहरातील चांदमारी परिसरात एका ६१ वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी पुंडलीक तासतोडे (वय ६१, रा. चांदमारी) हे २१ जून रोजी चांदमारी परिसरातील टेकडीवर असलेल्या निंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. गल्लीत…

Read More

विहिरीत आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह; आत्महत्या की घातपात? तपास सुरू

मेरा बु. : गावातील मुख्य चौकातील बसस्टॉपजवळ असलेल्या विहिरीत ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने आत्महत्या की घातपात, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. अंढेरा पोलीस सूत्रांकडून व नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव…

Read More

कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढाकाराने मलकापुरात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

मलकापूर (प्रतिनिधी): स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, गायत्री परिवार मलकापूर आणि जनता कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २१ जून २०२६ रोजी सकाळी ४.४५ ते ६.३० या वेळेत जनता कला व वाणिज्य महाविद्यालय येथे योग दिन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले…

Read More

नूतन इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन

न मलकापूर : – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नूतन इंग्लिश स्कूल, मलकापूर येथे विविध योगासने व प्राणायामाच्या प्रात्यक्षिकांसह योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही योगाभ्यासात सहभाग घेत निरोगी जीवनाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी योग प्रार्थनेने सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ. संदीप कौर यांनी योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित…

Read More
error: Content is protected !!