वादळी वाऱ्यासह गारपीट; मलकापूर-मोताळा तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान
मलकापूर :- मलकापूर व मोताळा तालुक्यात गेल्या काही दिवसांत वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवघ्या दहा दिवसांत दुसऱ्यांदा झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ३० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसासोबत गारांचा मारा झाल्याने मका, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके वादळ आणि…
