Headlines

धानोरा येथील १९ वर्षीय युवती बेपत्ता; मलकापूर ग्रामीण पोलिसांत मिसिंगची नोंद

मलकापूर : नांदुरा तालुक्यातील धानोरा येथून १९ वर्षीय युवती अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी तिचा नातेवाईकांसह सर्वत्र शोध घेतला; मात्र ती आढळून न आल्याने मलकापूर ग्रामीण पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राजेंद्र रायभान धाडे, रा. धानोरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी दुर्गा राजेंद्र धाडे (वय १९) ही ३ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या दरम्यान घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा परिसरासह नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही.
याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी मिसिंग क्रमांक १६/२०२६ अशी नोंद केली आहे. पुढील तपास पदविधर पोका पंकज वराडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!