बांधकामावर काम करताना उंचावरून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू
शेगाव : शहरातील जमजम नगर परिसरात निर्माणाधीन इमारतीवर बांधकामाचे काम करत असताना उंचावरून पडल्याने २७ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १८ जुलै रोजी सायंकाळी घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत युवकाचे नाव शेख समीर शेख चांद (२७, रा. मशिदीजवळ, मेहबूब नगर, खामगाव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख समीर…
