मलकापूर : तालुक्यातील दसरखेड परिसरात शेतातील गोठ्याजवळ उभी असलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेद्र छगन महाजन (रा. दसरखेड, ता. मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ एप्रिलच्या पहाटे ३.३५ वाजेच्या सुमारास त्यांच्या टोलनाक्याजवळील शेतात असलेल्या गुरांच्या गोठ्याजवळ उभी असलेली काळ्या रंगाची युनिकॉन मोटारसायकल (क्र. एमएच ५६ डी २५४९) अज्ञात दोन चोरट्यांनी चोरून नेली. या मोटारसायकलची किंमत अंदाजे ८० हजार रुपये आहे.
या तक्रारीवरून दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अप. क्र. ६०/२०२६ नुसार बीएनएस २०२३ च्या कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.