Headlines

दारूच्या नशेत दुचाकी चालविणाऱ्यावर गुन्हा, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : शहरातील बुलढाणा रोडवर दारूच्या नशेत दुचाकी अनियंत्रितपणे चालविणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय तपासणीत संबंधित व्यक्ती मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास बुलढाणा रोडवरील तुलसी ज्वेलर्ससमोर एक व्यक्ती मोटारसायकल क्रमांक एमएच २८ झेड ८९४० ही दुचाकी वाकडी-तिकडी व अनियंत्रितपणे चालविताना आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी वाकोडी, ता. मलकापूर येथील रमेश धोंडीराम तायडे (वय ४०) याच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात अप. क्र. ५६३/२०२६, कलम १८५ मोटार वाहन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!