वृद्ध वडिलांना मुलाकडून मारहाण; शेगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा
शेगाव : किरकोळ कारणावरून ७० वर्षीय वृद्ध वडिलांना शिवीगाळ करून हात पिरगाळत मारहाण केल्याची घटना शेगाव तालुक्यातील गोळेगाव बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोंद्राजी बाबन समदुर (७०, रा. गोळेगाव बुद्रुक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुनील बोंद्राजी समदुर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
