Headlines

साखरखेर्डा बसस्थानक बनले हाणामारीचे केंद्र; दोन गटांत तुफान राडा, काठी अन् लोखंडी रॉडने हल्ला; चौघे गंभीर जखमी, पोलिस ठाण्यातही पुन्हा वाद

साखरखेर्डा : बसस्थानक परिसरात दोन गटांतील वादातून हाणामारीच्या घटना सातत्याने घडत असून, शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सकाळी पुन्हा दोन गटांत तुफान राडा झाला. काठी आणि लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ला चढविल्याने चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना बुलढाणा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, बसस्थानकावरील हाणामारीनंतर तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या दोन्ही…

Read More

गर्भलिंग तपासणीच्या आरोपानंतर अरबट सोनोग्राफी सेंटरची चौकशी; कामकाजात आढळल्या त्रुटी, सोनोग्राफी मशीन सील

खामगाव:- येथील अरबट सोनोग्राफी व एक्स-रे सेंटरमध्ये गर्भलिंग तपासणी करून स्त्रीभ्रूणहत्या केली जात असल्याचा आरोप करत सेंटरच्या माजी कंपाऊंडरने केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने चौकशी केली. जिल्हास्तरीय चौकशी समितीने केलेल्या तपासणीत सेंटरच्या कामकाजात विविध त्रुटी आढळून आल्याने २ ऑक्टोबर रोजी जिल्हा सल्लागार समितीच्या निर्णयानंतर पीसीपीएनडीटी पथकाने सोनोग्राफी मशीन सील केली. याबाबत जिल्हा चौकशी समितीचे प्रमुख डॉ. सुशीर…

Read More

कत्तलीच्या उद्देशाने ८ गोवंशांची वाहतूक; पिकअपसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी कारवाई करत आठ गोवंशांची सुटका केली. या कारवाईत जनावरांसह बोलेरो पिकअप असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्री…

Read More

अपघातात तरुणाचा मृत्यू; मुलासोबत नाश्ता करताना भरधाव कारची धडक, मोताळा येथील घटना

मोताळा : रस्त्याच्या कडेला मुलासोबत नाश्ता करण्यासाठी बसलेल्या तरुणाला भरधाव ओमनी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदुरा तालुक्यातील तरवाडी बसस्टॉपजवळ ३० सप्टेंबर रोजी हा अपघात घडला. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरवाडी बसस्टॉपजवळील हॉटेल परिसरात बन्सिलाल कनासे हे आपल्या मुलासोबत रस्त्याच्या बाजूला बसले होते. त्याचवेळी सिल्लोड तालुक्यातील…

Read More

पोस्ट ऑफिससमोर दोन तलवारी घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर मुख्य पोस्ट ऑफिससमोर दोन धारदार तलवारी बाळगून फिरणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे चार हजार रुपये किमतीच्या दोन तलवारी जप्त केल्या असून, शस्त्र अधिनियमासह महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१० वाजताच्या सुमारास शहर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग…

Read More

पहुरजिरा येथे शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

जलंब : राहत्या घरात गळफास घेऊन ३६ वर्षीय शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पहुरजिरा येथे उघडकीस आली. सुरेश महादेव बुंदे असे मृत शेतमजुराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश महादेव बुंदे (वय ३६, रा. पहुरजिरा, ता. शेगाव) हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११…

Read More

कंपनीतील केमिकलयुक्त पाण्याने मलकापूर येथील युवकाचा मृत्यू; दसरखेड येथील घटना

मलकापूर : दसरखेड येथील बँजो केमिकल कंपनीत काम करीत असताना केमिकलयुक्त वेस्टेज पाणी अंगावर व तोंडावर उडाल्याने गंभीर जखमी झालेल्या ३३ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ललित वाघ, रा. मलकापूर असे मृत युवकाचे नाव असून, ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ललित वाघ हे दसरखेड येथील बँजो केमिकल कंपनीमध्ये काम करीत…

Read More