Headlines

राहत्या घरी गळफास; २७ वर्षीय महिलेची आत्महत्या; शेगांव येथील घटना

शेगाव : शहरातील व्यंकटेश नगर परिसरात एका २७ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना ५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेगाव शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
कीर्ती राजेश गोंड (२७, रा. व्यंकटेश नगर, शेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती गोंड यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच त्यांना तातडीने उपचारासाठी सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. याबाबत रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या लेखी मेमोच्या आधारे ६ सप्टेंबर रोजी शेगाव शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या महिलेने आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!