Headlines

विद्यार्थ्यांना एसटी बसेस च्या पासेस काढण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी लावण्याची शिवसेना (उबाठा)ची मागणी

मलकापूर:- मलकापूर बस स्थानकात विद्यार्थ्यांच्या बसेसच्या पास काढण्यासाठी दोनच कर्मचारी असून विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगाच्या रांगा पासेस काढण्यासाठी आठ दिवसांपासून लागत आहे. आज सकाळी नऊ वाजे दरम्यान एका विद्यार्थ्याला चक्कर येऊन पडल्याने याबाबतची माहिती संबंधित पालकांनी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना दिल्याने त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह आगार व्यवस्थापक देशमाने यांची भेट घेऊन कर्मचारी वाढविण्याची मागणी केली आहे. याबाबत सविस्तर उत्तर सुखी गेल्या आठ दिवसापासून एसटी बसेस च्या पासेस काढण्यासाठी विद्यार्थिनी व विद्यार्थिनींच्या भल्या मोठ्या रांगा बस स्थानकावर पहाटेपासूनच लागत आहे.पासेस काढण्यासाठी दोनच कर्मचारी असल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने अतिरिक्त कर्मचारी वाढून व विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधाही करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम सै. रहीम, शिवसेना उपशहरप्रमुख शकील जमादार, युवा सेना शहरप्रमुख मंगेश सातव, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी, विभागप्रमुख सत्तार शाह,राहुल हिवाळे,
निंबाजी तायडे,दिनानाथ गारमोडे ,मयूर हिवाळे,आदित्य हिवाळे सह आदिंची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!