Headlines

चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकची दुचाकीला धडक; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मेहकर येथील घटना

मेहकर : कामानिमित्त दुचाकीने मेहकरकडे निघालेल्या २३ वर्षीय तरुणाच्या प्रवासाचा देऊळगाव माळी फाट्यानजीक झालेल्या अपघाताने दुर्दैवी अंत झाला. चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सोमवारी (दि. १४) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
निशीन प्रकाश कापरे (वय २३, रा. देऊळगाव माळी) हा तरुण दुचाकीने मेहकरच्या दिशेने जात होता. नागझरी खुर्दजवळील देऊळगाव माळी फाट्यानजीक समोरून चुकीच्या दिशेने आलेल्या एमएच-१६, एव्हाय-८१९९ क्रमांकाच्या ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, निशीन रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच त्याला उपचारासाठी मेहकर येथील गाभणे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच निशीन याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देऊळगाव माळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!