शेगाव बस स्थानकातून बस मध्ये बसलेल्या प्रवाशाच्या खिशातून सोन्याची पोत चोरी

शेगाव :- बसस्थानकातून सुटलेल्या बसमध्ये प्रवास करत असलेल्या एका वृद्ध प्रवाशाच्या खिशातून अज्ञात चोरट्याने सोन्याची पोत लंपास केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महादेव प्रल्हाद हिवरे (वय ६६, रा. सांगवी, ता. तेल्हारा, जि. अकोला) हे १६ एप्रिल रोजी शेगाव येथून सांगवीकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत होते. प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातील सोन्याची पोत चोरून नेली. चोरीस गेलेली पोत सुमारे ५ ग्रॅम वजनाची असून त्यात ४६ मणी असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!