मोताळा :- तालुक्यातील भाडगणी शिवारात एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह शेतातील टिनपत्र्याच्या खोलीत आढळून आल्याची घटना १८ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सचिन गजानन क्षीरसागर असे मृत तरुणाचे नाव असून, तो शेतातील खोलीत लोखंडी पाइपला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळला. ही बाब सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लक्षात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर तालुक्यातील भाडगणी येथील शेखर गजानन गावंडे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. कमलाबाई मानकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.