Headlines

सलूनसमोर उभी दुचाकी क्षणात गायब; ६५ हजारांची गाडी चोरट्याने लांबवली, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : शहरात वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसत नसल्याचे पुन्हा समोर आले असून, बन्सीलाल नगर रोड परिसरातून सलूनसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. सुमारे ६५ हजार रुपये किमतीच्या या वाहन चोरीप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बन्सीलाल नगर येथील देविदास अमृत बोंबटकार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांनी बन्सीलाल नगर रोडवरील आम जेन्ट पार्लर सलूनसमोर आपली दुचाकी उभी केली होती. वाहन क्रमांक एमएच ५६ डी ६८८२ असलेली ही दुचाकी काही वेळाने परत येऊन पाहिली असता जागेवर दिसून आली नाही. अज्ञात चोरट्याने संधी साधून सुमारे ६५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध अप. नं. ८७७/२०२६, कलम ३०३(२) बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुचाकी चोरट्याचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *