Headlines

सार्वजनिक बांधकाम विभागाचा राज्यस्तरीय पुरस्कार इंजि. सचिन तायडे यांना जाहीर; उत्कृष्ट तांत्रिक व प्रशासकीय सेवेची महाराष्ट्र शासनाकडून दखल

मलकापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेत रस्त्यांसह रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींच्या कामांना गती देत उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य व प्रशासकीय कार्यक्षमता दाखविणाऱ्या मलकापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता श्रेणी-१ इंजि. सचिन निवृत्ती तायडे यांच्या उल्लेखनीय कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आहे. सन २०२५-२०२६ या कालावधीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट…

Read More

रावेर लोकसभा संपर्कप्रमुख पदी गुलाबराव पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार

मलकापूर:- रावेर लोकसभा संपर्कप्रमुख पदी गुलाबराव पाटील (वाघ) यांची निवड झाल्याने दि.10सप्टेबर रोजी धरणगाव (जळगाव खां)येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मलकापूर विधानसभा सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा रावेर लोकसभेत येत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार रावेर लोकसभा संपर्कप्रमुख…

Read More

एसटी बस तपासणीदरम्यान मलकापूरच्या सहायक वाहतूक निरीक्षकास मेहकर मध्ये मारहाण; वाहकाविरुद्ध गुन्हा

मलकापूर : एसटी बसची तपासणी सुरू असताना प्रवासी रिपोर्ट मागितल्याच्या कारणावरून वाहकाने मार्ग तपासणी पथकातील सहायक वाहतूक निरीक्षकास शिवीगाळ करीत धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना मेहकर बसस्थानकावर घडली. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी रिसोड आगारातील संबंधित वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर येथील रहिवासी संजय डिगंबर नारखेडे हे रा.प. महामंडळाच्या बुलढाणा विभागात सहायक वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत…

Read More

कर्जदारांकडून वसुली केली; कंपनीत भरणा न करता रक्कम लाटल्याचा आरोप; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : कर्जदारांकडून नियमितपणे वसूल केलेल्या हप्त्यांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार मलकापूर शहरातील स्पंदना स्फुर्ती फायनान्शियल लिमिटेडच्या शाखेत उघडकीस आला आहे. ऑडिटदरम्यान झालेल्या तपासणीत तब्बल १ लाख १९ हजार २५० रुपयांचा अपहार समोर आल्यानंतर शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा रोडवरील…

Read More

सहा महिन्यांनी अपघाताची नोंद; कारच्या धडकेत ६५ वर्षीय शेतकरी जखमी, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर :- रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्याला भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झाले. तब्बल सहा महिन्यांनंतर जखमी शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र वासुदेव पाटील (वय ६५, रा. चाळीसबिगा, मलकापूर) हे २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेनऊ…

Read More

कॉलेजला जाते सांगून घरातून निघाली, ६० हजार रुपयेही सोबत; २२ वर्षीय तरुणी बेपत्ता, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघालेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना मलकापूर शहरात समोर आली आहे. घरातून निघताना ती ६० हजार रुपये घेऊन गेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले असून, अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फुकटपुरा,…

Read More

मलकापूर-बुलढाणा मार्गावरील अतिक्रमणावर जेसीबीचा हातोडा

मलकापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मलकापूर – बुलढाणा – चिखली राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला असून, मलकापूर शहरातील बुलढाणा रोडवरही बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा आणि महामार्गाचे बीओटी तत्वावर काम घेतलेल्या बुलढाणा अर्बनच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कारवाईत दाताळा ते मलकापूर बसस्थानकादरम्यान रस्त्यालगत उभारलेली…

Read More

नोकरीच्या आमिषाने तब्बल २० लाख ७४ हजारांची फसवणूक; बनावट बँक कागदपत्रे तयार केल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : कंपनीत मुलगा आणि जावयाला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत विविध व्यक्तींकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार मलकापूर शहरात समोर आला आहे. नोकरीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून दिलेली रक्कम परत मागितल्यानंतर बनावट बँक कागदपत्रांच्या माध्यमातून व्यवहार खरा असल्याचे भासविल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल २० लाख ७४ हजार १४० रुपयांची फसवणूक झाल्याचे…

Read More

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देत अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप; पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

मलकापूर : विद्यार्थ्यांना भीती दाखवून मानसिक दबावात ठेवणे, अनुचित स्पर्श करणे तसेच वर्गात अपमानास्पद व दंडात्मक वर्तन केल्याचा गंभीर आरोप झेडए उर्दू ज्युनिअर कॉलेजमधील एका शिक्षकावर करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती व मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगत संबंधित शिक्षकावर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे….

Read More

नऊ दिवस रंगला श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा अनोखा सोहळा; बंजारा समाजाच्या वतीने पारंपारिक तिज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

मलकापूर : पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधत मलकापूरातील गजानन नगरी परिसरात बंजारा समाजाच्या वतीने पारंपारिक तिज उत्सव मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. नऊ दिवस चाललेल्या या उत्सवात धार्मिक विधी, पारंपारिक पूजा, भजन-कीर्तन, लोकगीते आणि नृत्याच्या माध्यमातून बंजारा समाजाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवायला मिळाली. उत्सवाच्या काळात बंजारा समाजातील महिला व तरुणींनी आकर्षक आणि…

Read More
error: Content is protected !!