Headlines

पोलिसांना पाहताच वाळू रस्त्यावर टाकून चालक पसार; ट्रॅक्टरसह ८.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर : राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी मलकापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दसरखेड परिसरात पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर चालकाने वाळू रस्त्यावर खाली टाकून घटनास्थळावरून पलायन केले. या कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टरसह तब्बल ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १.३०…

Read More

बाजीप्रभूनगरमध्ये पोलिसांची भेट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन, चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पी.एस.आय. जाधव यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांची जनजागृती

मलकापूर : शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहर पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध भागात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने बाजीप्रभूनगर येथील परिसराला पी.एस.आय. जाधव यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत चोरीच्या घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. घर किंवा दुकान बंद करून बाहेर जाताना विशेष…

Read More

धरणगाव ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे तांत्रिक व आर्थिक ऑडिट करा! ३० दिवसांत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा

मलकापूर : धरणगाव ग्रामपंचायत, ता. मलकापूर येथील मागील कालावधीत शासन तसेच ग्रामपंचायतीच्या विविध निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून तांत्रिक आणि आर्थिक ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मलकापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धरणगाव ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम, पेव्हर ब्लॉक, पाणीपुरवठा योजना तसेच विविध विकासकामे करण्यात आली…

Read More

चेहरा रूमालाने झाकून संशयास्पद वावर; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर : चेहऱ्याला रूमाल बांधून स्वतःची ओळख लपवत रात्रीच्या अंधारात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका इसमाविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रेल्वे स्टेशनजवळील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड परिसरात करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास रविंद्र कालुसिंग भोसले (वय ५३, रा….

Read More

मलकापूरमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीचा जल्लोष; रशियातील शिवरायांच्या पोवाड्याचा देखावा ठरला विशेष आकर्षण

मलकापूर :- साहित्यसम्राट व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मलकापूर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्व समाजघटकांसह महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केल्याचा साकारण्यात आलेला देखावा विशेष…

Read More

भाडगणी गावात चोरट्यांची भीती वाढली; सुरक्षा उपाययोजनांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?

भाडगणी : गावात चोरीच्या घटनांची भीती वाढत असताना ग्रामपंचायतीच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावातील अनेक भागांमध्ये अद्याप पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे चोरट्यांना अंधाराचा फायदा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गावात CCTV कॅमेरे बसविण्याची मागणी होत असतानाच अनेक ठिकाणी साधे पथदिवेही उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे…

Read More

पुर्णा नदीपात्रात ४८ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला; मलकापूर शहर पोलिसांत मर्ग दाखल

मलकापूर : धुपेश्वर येथील पूर्णा नदीच्या पात्रात मलकापूर येथील ४८ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पाण्यात बुडाल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले असून, या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील कक्षसेविका अलका एकनाथ काळे यांनी दिलेल्या माहितीवरून, २९ ऑगस्ट…

Read More

हॉटेलमध्ये जेवल्यानंतर ६५ वर्षीय इसमाचा मृत्यू; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, मदीना हॉटेलची तपासणी करून अन्नाचे नमुने घेतले; त्रुटी आढळल्याने हॉटेल बंद करण्याचे निर्देश

मलकापूर : शहरातील वल्लीचौक परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर ६५ वर्षीय इसमाची प्रकृती अचानक बिघडून मृत्यू झाल्याच्या तक्रारीने खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने संबंधित हॉटेलची तपासणी करून अन्नपदार्थांचे नमुने ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्याने हॉटेल मालकाला नोटीस बजावून हॉटेल बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती…

Read More

बुलडाणा जिल्ह्यात चोरट्यांसह गुन्हेगारी वाढली; ग्रामीण भागात दहशत, “आपलं गाव आपली जबाबदारी”तून तरुणांचा रात्री पाहारा

मलकापूर :- बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत. रोजच कुठे ना कुठे चोरी उघडकीस येत आहे. नांदुरा तालुक्यातील काटी येथे दरोड्यात एका व्यक्तीचा खून आणि माकनेर येथे महिलेवर हल्ला, खामगाव-बुट्टी येथे चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या घटना घडल्या आहेत. मलकापूरमध्ये चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत….

Read More

पावसाच्या लहरीपणामुळे पिके धोक्यात; मलकापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची शिवसेना (उबाठा)ची मागणी

मलकापूर : अपुरा पाऊस, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि आता पुन्हा पावसाने दिलेली दीर्घ उघडीप यामुळे मलकापूर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने मलकापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जून महिन्यात पेरणीच्या काळात…

Read More
error: Content is protected !!