खामगाव : माहेरहून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पतीसह सासऱ्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव येथील गांधी ले-आऊट परिसरातील कल्याणी प्रशांत राव यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांचे पती प्रशांत विजयकुमार राव यांना दारू पिण्याची सवय असून ते दारूच्या नशेत फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ व मानसिक त्रास देत होते. तसेच माहेरहून पैसे आणण्यासाठी पती व सासऱ्याकडून वारंवार दबाव टाकून छळ करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी प्रशांत विजयकुमार राव (वय ३८) व विजयकुमार नायडू (वय ६६, दोघेही रा. जबलपूर, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.